शोधा › विषय › व्यापार आणि व्यापारी
दैनंदिन जीवन
बायबलमध्ये व्यापार आणि व्यापारी
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 37 उतारे, ओळीनुसार.
- अब्राहाम “व्यापाऱ्याकडचे चलनी” चांदी तोलून देतोउत्प 23:16
वचने
उत्प 23:16तेव्हा अब्राहामाने एफ्रोनाचे ऐकले आणि हेथीची मुले ऐकत असता त्याने जितके रुपे सांगितले होते तितके, म्हणजे व्यापाऱ्याकडचे चलनी चारशे शेकेल रुपे एफ्रोनाला तोलून दिले.
- इश्माएली काफिला मसाले, सुगंधी औषध आणि गंधरस मिसरला नेतोउत्प 37:25
वचने
उत्प 37:25ते भाकरी खाण्यास खाली बसले. त्यांनी वर नजर करून पाहिले, तो पाहा, इश्माएली लोकांचा तांडा मसाल्याचे पदार्थ व सुगंधी डिंक व बोळ लादलेल्या उंटांसहीत गिलाद प्रदेशाहून येत होता. ते खाली मिसर देशाकडे चालले होते.
- योसेफाला व्यापाऱ्यांना वीस शेकेल चांदीला विकले जातेउत्प 37:28, उत्प 37:36
वचने
उत्प 37:28ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.
उत्प 37:36त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफाला मिसर देशात पोटीफर नावाचा फारो राजाचा अधिकारी, अंगरक्षकाचा सरदार याला विकून टाकले.
- हिराम गंधसरू आणि देवदारू पाठवतो; शलमोन गहू आणि जैतुनाचे तेल देऊन मोबदला देतो1 राजे 5:8–11, 2 इति 2:15
वचने
1 राजे 5:8–11मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला, “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुझ्या ईच्छेप्रमाणे देईन. माझे नोकर ती लबानोनातून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करून तुला हव्या त्याठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तेथून तू घे. माझ्या सेवकांना अन्नपुरवठा तू दिला तो माझ्या ईच्छेनुसार पुरेसा असेल.” हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची लाकडे पुरवली. शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी वीस हजार कोर गहू आणि वीस कोर शुद्ध तेल दिले.
2 इति 2:15माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षरस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.
- शलमोनाचे जहाजांचे काफिले ओफीराहून 420 किक्कार सोने आणतात1 राजे 9:26–28
वचने
1 राजे 9:26–28एसयोन-गेबेर येथे शलमोन राजाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे. समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाश्यांबरोबर पाठवले. शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून चारशे वीस किक्कार सोने शलमोन राजाकडे आणले.
- शलमोनाला व्यापारी आणि सौदागरांकडून उत्पन्न मिळते1 राजे 10:15, 2 इति 9:14
वचने
1 राजे 10:15या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.
2 इति 9:14याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने चांदी आणत, ते वेगळेच
- अलीमलेखाची जमीन नामी विकतेरूथ 4:3
वचने
रूथ 4:3मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे,
- सोनार आणि व्यापारी यरूशलेमेच्या तटबंदीचा एक भाग दुरुस्त करतातनहे 3:32
वचने
नहे 3:32कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.
- सोरेची माणसे शब्बाथ दिवशी यरूशलेमेत मासे विकतातनहे 13:16
वचने
नहे 13:16सोरे नगरातील काही लोक यरूशलेमामध्ये राहत होते आणि ते मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू शब्बाथ दिवशी यरूशलेमेमध्ये यहूदी व इतर लोकांस आणून विकत.
- नहेम्या वेशी बंद करतो; व्यापारी नगराबाहेर मुक्काम करतातनहे 13:19–20
वचने
नहे 13:19–20प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही. एकदोन वेळेला व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्या विक्रेत्यांना यरूशलेमेबाहेर रात्री रहावे लागले.
- कर्तबगार पत्नी शेत विकत घेते आणि तागाची वस्त्रे विकतेनीति 31:16, नीति 31:24
वचने
नीति 31:16ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.
नीति 31:24ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.
- पौलाचे जहाज सोर येथे आपला माल उतरवतेप्रेषि 21:2–3
वचने
प्रेषि 21:2–3तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरीया प्रांताला रवाना झालो व सोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता.
- थुवतीरा येथील जांभळी वस्त्रे विकणारी लुदियाप्रेषि 16:14
वचने
प्रेषि 16:14तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची उपासना करणारी होती, तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.
- मंदिराच्या आवारात सराफ आणि कबुतरे विकणारेयोहा 2:14
वचने
योहा 2:14आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले.
- एक व्यापारी एका मौल्यवान मोत्यासाठी आपले सर्वस्व विकतो (दाखला)मत्त 13:45–46
वचने
मत्त 13:45–46आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
- दासांना व्यापार करण्यासाठी पैसा दिला जातो (दाखला)लूक 19:13, मत्त 25:16
वचने
लूक 19:13त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’
मत्त 25:16ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या.
- “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ” आणि व्यापार करूयाको 4:13
वचने
याको 4:13अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.”
सोरेबरोबरचा व्यापार (यहेज्केल 27)
- तार्शीश: चांदी, लोखंड, कथील आणि शिसेयहे 27:12
वचने
यहे 27:12तार्शीश तुझा ग्राहक होता कारण प्रत्येक प्रकारचा मालमत्तेचा साठा तुझ्याकडे होता. ते तुझ्या मालाच्या बदल्यात रुपे, लोखंड, कथील व शिसे आणून विकायचा माल घेत असत.
- यावान, तुबाल आणि मेशेख: गुलाम आणि पितळेची भांडीयहे 27:13
वचने
यहे 27:13यावान, तुबाल आणि मेशेख तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पितळेच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करीत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते.
- बेथ-तोगार्मा: घोडे, स्वारीचे घोडे आणि खेचरेयहे 27:14
वचने
यहे 27:14तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देऊन तुझ्याशी व्यापार करीत.
- ददान: खोगिरावरील कापड; किनारपट्टीचे देश: हस्तिदंत आणि आबनूसयहे 27:15, यहे 27:20
- अराम: पीरोजा, जांभळे कापड, भरतकाम, तलम ताग, पोवळे आणि माणकेयहे 27:16
वचने
यहे 27:16तुझ्या पुष्कळ उत्पन्नात अराम तुझा व्यापारी होता. ते तुझ्याबद्दल पाचू, जांभळ्या रंगाचे कापड, सुती तलम कापड, पोवळे आणि माणके तुला पुरवत होते.
- यहूदा आणि इस्राएल: गहू, मध, तेल आणि सुगंधी औषधयहे 27:17
वचने
यहे 27:17यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते.
- दिमिष्क: हेल्बोनाचा द्राक्षारस आणि लोकरयहे 27:18
वचने
यहे 27:18तुझ्या सर्व प्रचंड संपत्तीचा, तुझ्या सर्व मालाचा हेल्बोनाचा द्राक्षरस व पांढरी लोकर यांनी दिमिष्की तुझा व्यापारी होता.
- अरबस्तान आणि केदार: कोकरे, एडके आणि बोकडयहे 27:21
वचने
यहे 27:21अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते.
- शबा आणि रामा: मसाले, मौल्यवान रत्ने आणि सोनेयहे 27:22
वचने
यहे 27:22शबा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मोल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते.
नियमशास्त्रात
- प्रामाणिक तराजू, वजने आणि मापेलेवी 19:35–36, अनु 25:13–15
वचने
लेवी 19:35–36लोकांचा न्याय करताना तुम्ही योग्य न्याय करावा; मोजण्यामापण्यात व तोलण्यात तुम्ही अन्याय करु नका. तुमच्यापाशी खरी मापे, खरी वजने, खरे तराजू, खरा एफा व खरा हिन असावा. मी परमेश्वर तुमचा देव आहे! मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले!
अनु 25:13–15बनावट तराजू वापरुन लोकांची फसवणूक करु नये. वजने अति जड किंवा अति हलकी अशी तुझ्या पिशवीत नसावीत. आपल्या घरात मापे फार मोठी किंवा फार लहान असू नयेत. आपली वजने मापे अचूक आणि योग्य असावीत. म्हणजे तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही दीर्घकाळ रहाल.
- खरेदी करणाऱ्याने आणि विकणाऱ्याने एकमेकांचा गैरफायदा घेऊ नयेलेवी 25:14
वचने
लेवी 25:14तुम्ही आपल्या शेजाऱ्याला जमीन विकाल किंवा त्याच्याकडून जमीन विकत घ्याल तेव्हा एकमेकावर अन्याय करु नका.
वचने
- विकत घेणारा म्हणतो, “वाईट! वाईट!”, मग जाताना फुशारकी मारतोनीति 20:14
वचने
नीति 20:14विकत घेणारा म्हणतो, वाईट! वाईट! परंतु जेव्हा तो तेथून निघून जातो तो फुशारकी मारतो.
- धान्य विकण्यासाठी शब्बाथ संपण्याची वाट पाहणारे व्यापारीआमो 8:5
वचने
आमो 8:5तुम्ही म्हणता “चंद्रदर्शन केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हास गहू विकता येईल? मग आपण एफा लहान करू, व शेकेल नाणे मोठे करू व कपटाचे तराजू घेऊन फसवू.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क