अनेक दिवस जळत राहिलेल्या आगीने नगराचा मोठा भाग नष्ट केला. इतिहासकार टॅसिटस लिहितो की नीरोने ख्रिस्ती लोकांना दोष दिला आणि त्यांच्यापैकी अनेकांना ठार मारवले — रोमने ख्रिस्ती लोकांचा केलेला हा सर्वांत जुना ज्ञात छळ.
बायबलमध्ये · सुमारे इ.स. 60–62 · रोम
रोममध्ये पौल
मिलिता (माल्टा) बेटाजवळ जहाज फुटल्यानंतर पौल रोमला पोहोचतो, जेथे तो पहाऱ्याखाली दोन वर्षे राहतो आणि भेटायला येणाऱ्यांचे स्वागत करतो.
आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासास निघालो, ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते, त्या जहाजाच्या समोरील बाजूस जुळ्या भावाचे चिन्ह होते. मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहचलो आणि तेथे तीन दिवस राहिलो. तेथून शिडे उभारून आम्ही निघालो आणि रेगियोन नगराला गेलो, तेथे एक दिवस मुक्काम केला, नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो. त्या शहरात आम्हास काही बंधुजन भेटले, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो, मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो. तेथील बंधूनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती, ते आमच्या भेटीसाठी अप्पियाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले, पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले व त्यास धीर आला. आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली, परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला. तीन दिवसानंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले, जेव्हा सर्वजण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही, तरी मला यरूशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि जेव्हा त्यांनी माझी चौकशी केली, तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती, कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता. परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले, याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. या कारणासाठी तुम्हास भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली, कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळ्यांनी जखडलो गेलो आहे.” यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हास तुमच्याबाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही.” परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे, कारण या गटाविरुद्ध सगळीकडे लोक बोलतात हे आम्हास माहीत आहे. तेव्हा यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले, तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली, मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला, हे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता. त्याने फोड करून सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरून मतभेद होऊन त्यांच्यापैकी काहीजण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता.” या लोकांकडे तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहत ते तुम्हास कळणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते. म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील. तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.त्याच वेळी जगात
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा शेवट पौल रोममध्ये दोन वर्षे पहाऱ्याखाली असताना, सुमारे इ.स. 60–62, भाड्याच्या घरात उघडपणे शिकवत असल्याने होतो (प्रेषितांची कृत्ये 28:30–31). सम्राट नीरो होता. हे आहे इ.स. 60 च्या दशकातील जग.
ब्रिटनमध्ये आइसिनी लोकांची राणी बूडिका हिने मोठ्या उठावाचे नेतृत्व केले आणि लोंडिनियम — पुढे लंडन बनलेले तरुण रोमन नगर — जाळले; त्यानंतर रोमनांनी तिचा पराभव केला.
आलेक्सांद्र येथे अभियंता हीरो याने वाफेने फिरणाऱ्या गोळ्याचे आणि हवा व पाणी यांवर चालणाऱ्या यंत्रांचे वर्णन केले. त्याचा काळ सहसा त्याने उल्लेख केलेल्या एका चंद्रग्रहणावरून ठरवला जातो, जे इ.स. 62 मधील एका ग्रहणाशी जुळते.
चिनी परंपरेनुसार हान सम्राट मिंग याला एका सोनेरी आकृतीचे स्वप्न पडले आणि त्याने पश्चिमेकडे दूत पाठवले. ते बौद्ध भिक्षू आणि ग्रंथ घेऊन परत आले, आणि त्यांच्यासाठी लुओयांग येथे श्वेत अश्व मंदिर बांधले गेले — चीनमधील पहिले बौद्ध मंदिर.
मध्य आशियातून आलेल्या कुषाण राजांनी आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारत यांवर पसरलेले साम्राज्य उभारले. त्यांचे प्रदेश रोम, भारत आणि चीन यांना जोडणाऱ्या मार्गांवर होते.
सुमारे 1110 मध्ये संकलित झालेले कीवचे “प्राथमिक इतिवृत्त” सांगते की प्रेषित अंद्रिया नीपरमधून वर गेला, जिथे पुढे कीव उभे राहणार होते त्या टेकड्यांवर त्याने क्रूस उभारला आणि तेथे मोठे नगर होईल असे भाकीत केले. इतिहासकार याला दंतकथा मानतात; एक अधिक जुनी परंपरा अंद्रियाचे कार्यक्षेत्र सिथिया सांगते.
स्रोत: Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0 · OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क