शोधा › जुने नकाशे › मोशेच्या पाच पुस्तकांतील ठिकाणे
नकाशा पूर्ण आकारात उघडा (3000 × 2481)
जुने नकाशे · 1826
मोशेच्या पाच पुस्तकांतील ठिकाणे नकाशाकार: Tanner, Henry Schenck · वर्ष: 1826
हेन्री एस. टॅनर यांनी 1826 मध्ये फिलाडेल्फिया येथे “पवित्र आणि लौकिक अशा दोन्ही प्राचीन लेखकांचे लेखन स्पष्ट करण्यासाठी” प्रकाशित केलेल्या «An Atlas of Ancient Geography» मधून. मुख्य नकाशा नाईलच्या त्रिभुज प्रदेशापासून आणि गोशेनपासून सीनायच्या वाळवंटातून कनान आणि सिरीयापर्यंत जातो; एक उपनकाशा “मोशेने उल्लेख केलेले पूर्वेकडील देश” दाखवतो — आर्मेनियातील अरारातपासून बाबेल आणि एलामपर्यंत.
Library of Congress मधील नकाशा
उतारे उत्प 10:1–32 नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली. याफेथाचे पुत्र गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते. गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते. यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते. यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले. हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते. कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते. कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला. तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे. त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती. त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे. मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले), व कफतोरीम, ह्यांचा पिता बनला. कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा, तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी, हिव्वी, आर्की व शीनी अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली. कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती. कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते. शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता. शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते. अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते. अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला. एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह हदोराम, ऊजाल, दिक्ला ओबाल, अबीमाएल, शबा, ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते. त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता. आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र. पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली. गण 33:1–49 मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या. पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले. मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले. इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले. ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले. त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले. मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला. लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती. लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले. त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला. सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला. लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले. लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते. लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला. त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला. किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले. हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला. रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले. रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला. लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला. रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला. लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले. शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले. लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला. मकहेलोथ सोडून ते तहथाला आले. लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले. तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला. लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला. हशमोना सोडून ते मोसेरोथला आले. त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला. बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले. होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले. याटबाथा येथून ते अब्रोनाला आले. अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला. लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला. लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता. याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता. अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता. कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले. लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला. त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले. पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला. लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते. मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले. लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले. अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला. लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते. त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0 ; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क