शोधा › जुने नकाशे › शलमोनाचे प्रांत
नकाशा पूर्ण आकारात उघडा (2530 × 3000)
जुने नकाशे · 1826
शलमोनाचे प्रांत नकाशाकार: Tanner, Henry Schenck · वर्ष: 1826
हेन्री एस. टॅनर यांनी 1826 मध्ये फिलाडेल्फिया येथे “पवित्र आणि लौकिक अशा दोन्ही प्राचीन लेखकांचे लेखन स्पष्ट करण्यासाठी” प्रकाशित केलेल्या «An Atlas of Ancient Geography» मधून. हा पट असे बारा प्रांत दाखवतो, ज्यांचे कारभारी वर्षातून प्रत्येकी एक महिना शलमोनाच्या घराण्याला अन्नसामग्री पुरवत; प्रांतांना पहिल्या राजे पुस्तकाच्या अध्याय 4 मधील कारभाऱ्यांची नावे दिली आहेत: बेन-हूर, बेन-देकेर, बाना, गेबेर आणि इतर.
Library of Congress मधील नकाशा
उतारे 1 राजे 4:7–19 इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. त्या बारा कारभाऱ्याची नावे अशी: बेन-हूर, हा एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता. माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी. अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता. बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी. तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता. रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती. इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाईम प्रांतावर होता. नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.) हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता. पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता. एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता. उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0 ; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क