बिब्लोस आणि सोर यांसारख्या नगरांतील फिनिशियन लेखनिक फक्त 22 अक्षरांनी लिहीत. नंतर ग्रीकांनी ही वर्णमाला स्वीकारली, आणि लॅटिन व सिरिलिक वर्णमाला तिच्यापासूनच उतरल्या आहेत. प्राचीन हिब्रू लिपी तिच्याशी अगदी जवळची होती.
बायबलमध्ये · सुमारे इ.स.पू. 1000 · यरूशलेम
दावीद यरूशलेम घेतो
सर्व इस्राएलावर राजा म्हणून अभिषिक्त झालेला दावीद यबूसी लोकांचे यरूशलेम नगर जिंकतो आणि त्याला आपली राजधानी, दावीदपूर, बनवतो.
इस्राएलच्या सर्व घराण्यांमधील लोक हेब्रोन येथे दावीदाजवळ एकत्र आले आणि त्यास म्हणाले, आपण इस्राएल लोक एकाच कुटुंबातले, एकाच हाडामांसाचेआहोत. शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.” मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. दावीद राज्य करायला लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. हेब्रोनमध्ये यहूदावर त्याने साडेसात वर्षे राज्य केले आणि तेहतीस वर्षे सर्व इस्राएल आणि यहूदावर यरूशलेमेमधून राज्य केले. राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरूशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात प्रवेश करू शकणार नाहीस, आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हास थोपवतील. दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.” तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले. दावीद त्या दिवशी आपल्या लोकांस म्हणाला, “यबूसी लोकांचा पराभव करायचा असेल तर खंदकमार्गे जा आणि त्या आंधळ्या पांगळ्या दावीदाच्या शत्रूंना गाठा. यावरूनच, आंधळे पांगळे यांना या देवाच्या घरात येता यायचे नाही अशी म्हण पडली.” दावीदाचा मुक्काम किल्ल्यात होता व त्याचे नाव दावीदपूर असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला. सोरेचा राजा हिराम याने आपले दूत दावीदाकडे पाठवले गंधसंरूची झाडे, सुतार, गवंडी हे ही त्याने पाठवले. त्यांनी दावीदासाठी निवासस्थान उभारले. तेव्हा परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलाचा राजा केले आहे हे दावीदाला पटले. तसेच देवाने आपल्या लोकांसाठी, इस्राएल राष्ट्रासाठी, त्याच्या (दावीदाच्या) राज्याला महत्व दिले आहे, हे ही त्यास उमगले.त्याच वेळी जगात
दावीदाने सुमारे इ.स.पू. 1000 मध्ये यरूशलेम घेतले आणि ते आपली राजधानी केले. बायबलबाहेर त्याचे नाव पहिल्यांदा सुमारे दीड शतकानंतर, तेल दान येथील एका दगडावर दिसते; तो “दावीदाच्या घराण्याविषयी” बोलतो. हे आहे सुमारे इ.स.पू. 1000 मधील जग.
मिसर त्रिभुज प्रदेशातील तानिसमधून राज्य करणारे राजे आणि थीब्स येथील आमूनचे महायाजक यांच्यात विभागलेला होता. 1 राजे 3:1 सांगते की शलमोनाने फारोच्या मुलीशी लग्न केले; तो फारो कोण होता, याबद्दल मतभेद आहेत.
चीनमध्ये झोउ लोकांनी शांग राजवंश उलथवला. आपला विजय समजावण्यासाठी त्यांनी शिकवले की स्वर्ग न्यायी राजाला राज्य करण्याचा अधिकार देतो आणि अन्यायी राजाकडून तो काढून घेतो — “स्वर्गाचा आदेश”, ही कल्पना सुमारे तीन हजार वर्षे टिकली.
मायसीनी राजवाडे पडल्यानंतर ग्रीसमध्ये नगरे थोडीच उरली आणि लोक लिहिणे विसरले होते. लोखंडाची अवजारे आणि शस्त्रे वापरात येऊ लागली होती.
उत्तर भारतात शेतकरी गावे पूर्वेकडे गंगेच्या मैदानात पसरली, आणि लोखंड वापरात आले. पुरातत्त्वज्ञ या लोकांना त्यांच्या बारीक रंगवलेल्या करड्या भांड्यांवरून (पेंटेड ग्रे वेअर) ओळखतात आणि त्यांना नंतरच्या वैदिक काळाशी जोडतात.
आजच्या मध्य युक्रेनच्या वन-गवताळ प्रदेशात चेर्नोलेस संस्कृतीचे शेतकरी धान्य पिकवत आणि गवताळ प्रदेशातून होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध डोंगरी किल्ले बांधत. एका मतानुसार ते स्लाव्ह लोकांच्या पूर्वजांपैकी होते; दुसऱ्या मतानुसार असा कोणताही संबंध नाही.
स्रोत: Theographic Bible Metadata, CC BY-SA 4.0 · OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क