शोधा › मार्ग › अबशालोमापासून दावीद पळतो
मार्ग
अबशालोमापासून दावीद पळतो
जैतुनाच्या डोंगरावरून महनाईमला, गिलगालमार्गे परत · 7 टप्पे · सरळ रेषांत ≈ 130 किमी
जिथे रेषा जमिनीच्या ठेवणीचे अनुसरण करते, तिथे तो एका अभ्यासकाने पुनर्रचित केलेला संभाव्य रस्ता आहे. अंतरे टप्प्यांमधील सरळ रेषांत आहेत, अंदाजे; पायी लागणारे दिवस दररोज सुमारे 30 किमी धरून मोजले आहेत.
टप्पे
- यरूशलेम2 शमु 15:14
तेव्हा यरूशलेमेमध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरूशलेमेच्या लोकांस तो मारून टाकेल.
- किद्रोन2 शमु 15:23
सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला मग सर्वजण वाळवंटाकडे निघाले.
- जैतूनाचा डोंगर2 शमु 15:30
दावीद शोक करत जैतूनाच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले तेही रडत होते.
- बहूरीम2 शमु 16:5
पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता.
- महनाईम2 शमु 17:24
दावीद महनाईम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलीं समवेत यार्देन नदी ओलांडली.
- गिलगाल2 शमु 19:15
मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्यास भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता.
- यरूशलेम2 शमु 20:3
दावीद यरूशलेम येथील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते त्यांना त्याने एका खास घरात ठेवले. आणि त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या स्त्रिया तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.
रेषा पाठाच्या क्रमाने मुक्कामांना जोडतात. जिथे रेषा जमिनीच्या उंचसखलपणाला धरून जाते, तो एका अभ्यासकाने पुन्हा उभा केलेला संभाव्य मार्ग आहे; इतरत्र ती सरळ आहे — मार्ग माहीत नाही. अंतरे मुक्कामांमधील सरळ रेषेत आहेत. तुटक रेषा: जहाजाने. फिकट: ठिकाण निश्चित नाही.
प्रत्येक बिंदू सर्वाधिक संभाव्य स्थळ आहे; फिकट बिंदू म्हणजे ओळख अनिश्चित आहे. ज्या ठिकाणांचे स्थळ अज्ञात आहे ती नकाशावर नाहीत.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · UBS Bible Routes, Dr Leen Ritmeyer © United Bible Societies 2023, CC BY-SA 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क