मार्ग
एलीयाचे प्रवास
करीथ ओहोळापासून होरेब आणि यार्देनपर्यंत · 13 टप्पे · सरळ रेषांत ≈ 1,220 किमी
जिथे रेषा जमिनीच्या ठेवणीचे अनुसरण करते, तिथे तो एका अभ्यासकाने पुनर्रचित केलेला संभाव्य रस्ता आहे. अंतरे टप्प्यांमधील सरळ रेषांत आहेत, अंदाजे; पायी लागणारे दिवस दररोज सुमारे 30 किमी धरून मोजले आहेत.
टप्पे
- गिलाद1 राजे 17:1
गिलाद येथील तिश्बी येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीया हा एक संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलाच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या जीविताची शप्पथ घेवून मी हे सांगतो की, येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”
- करीथ1 राजे 17:5
तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला.
- सारफथ1 राजे 17:10
तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो नगराच्या वेशीजवळ जातो तर त्यास एक स्त्री भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?”
- कर्मेल डोंगर1 राजे 18:20
तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले.
- किशोन1 राजे 18:40
एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
- इज्रेल1 राजे 18:46
परंतु एलीयावर परमेश्वराचा हात असल्यामुळे, धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरून घट्ट खोचले आणि सरळ इज्रेलपर्यंत तो अहाबाच्या पुढे धावत गेला.
- बैर-शेबा1 राजे 19:3
एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैर-शेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
- होरेब1 राजे 19:8
तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्या अन्नाच्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.
- दिमिष्कपोहोचल्याचे सांगितलेले नाही1 राजे 19:15
तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, “आता मागे जा आणि वाळवंटातून जाणाऱ्या रस्त्याने दिमिष्काला पोहोंचेपर्यंत चालत जा. दिमिष्कामध्ये जा आणि अरामाचा राजा म्हणून हजाएलला अभिषेक कर.
- गिलगाल2 राजे 2:1
आणि असे झाले की, एका वावटळीद्वारे परमेश्वर एलीयाला वर स्वर्गास घेणार होता, तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगालहून निघाला.
- बेथेल2 राजे 2:2
एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला बेथेल येथे पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे, व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते खाली बेथेलास गेले.
- यरीहो2 राजे 2:4
एलीया अलीशाला म्हणाला, “कृपाकरून तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे पाठवले आहे.” पण अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही.” मग ते यरीहोस आले.
- यार्देन2 राजे 2:6
नंतर एलीया अलीशाला म्हणाला, “तू कृपाकरून येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यार्देनेस पाठवले आहे.” अलीशा म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे व तू जिवंत आहे; मी तुला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे पुढे निघाले.
रेषा पाठाच्या क्रमाने मुक्कामांना जोडतात. जिथे रेषा जमिनीच्या उंचसखलपणाला धरून जाते, तो एका अभ्यासकाने पुन्हा उभा केलेला संभाव्य मार्ग आहे; इतरत्र ती सरळ आहे — मार्ग माहीत नाही. अंतरे मुक्कामांमधील सरळ रेषेत आहेत. तुटक रेषा: जहाजाने. फिकट: ठिकाण निश्चित नाही.
ठिपक्यांची रेषा: प्रवास जिकडे चालला होता — तो तिथे पोहोचला असे मजकूर सांगत नाही; रेषा आधीच्या थांब्यापासून पुढे जाते.
प्रत्येक बिंदू सर्वाधिक संभाव्य स्थळ आहे; फिकट बिंदू म्हणजे ओळख अनिश्चित आहे. ज्या ठिकाणांचे स्थळ अज्ञात आहे ती नकाशावर नाहीत.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · UBS Bible Routes, Dr Leen Ritmeyer © United Bible Societies 2023, CC BY-SA 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क