शोधा › यात्रेकरूंसाठी › एका आठवड्यात पवित्र भूमी › जन्माचे चर्च
एका आठवड्यात पवित्र भूमी · टप्पा 9 · दिवस 3
जन्माचे चर्च

बायबलमध्ये
योसेफ मरीयेसह नासरेथहून बेथलेहेमला गेला; तेथे तिने आपल्या पुत्राला जन्म दिला आणि त्याला गव्हाणीत ठेवले. नंतर पूर्वेकडून ज्ञानी लोक त्याला नमन करण्यासाठी आले.
मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले. आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन, तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की, “यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.” जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे? ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की; ‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’” मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली. त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.” राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली.परंपरा
2ऱ्या शतकात ज्ञात असलेल्या परंपरेनुसार, येशूचा जन्म येथील एका गुहेत झाला; चर्चखालील गुहेतील एक चांदीचा तारा ती जागा दाखवतो.
आज इथे
कॉन्स्टंटाईनच्या 4थ्या शतकातील चर्चच्या जागी जस्टिनियनची 6व्या शतकातील बॅसिलिका, वेदीखाली जन्माची गुहा.
जुन्या यात्रेकरूंच्या नजरेतून
तेथून दोन मैलांवर, डाव्या हाताला, बेथलेहेम आहे, जेथे आपला प्रभू येशू ख्रिस्त जन्मला. कॉन्स्टंटाईनच्या आज्ञेने तेथे एक बॅसिलिका बांधली गेली आहे.बोर्दोचा यात्रेकरू, 333 · आमचे भाषांतर
… त्यांनी आम्हाला जमिनीखाली, जिवंत खडकात कोरलेल्या एका गुहेत नेले. हीच ती “गव्हाण”, जेथे ख्रिस्त जन्मला. जमिनीत बसवलेल्या एका चांदीच्या ताऱ्यावर तसा अर्थ असलेला लॅटिन लेख आहे. उपासक यात्रेकरूंच्या अनेक पिढ्यांच्या चुंबनांनी तो गुळगुळीत झाला आहे.मार्क ट्वेन, The Innocents Abroad, 1869 · आमचे भाषांतर
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क