मुख्यपृष्ठ › मंडळीच्या वर्षातील सण › पेन्टेकॉस्ट
मंडळीच्या वर्षातील सण
पेन्टेकॉस्ट
ईस्टरनंतर पन्नास दिवसांनी: यरूशलेमेत शिष्यांवर पवित्र आत्म्याचे येणे, प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक सांगते त्याप्रमाणे, पेत्र उद्धृत करतो ती योएलची भविष्यवाणी आणि योहानाच्या शुभवर्तमानातील येशूची वचने यांसह.
तारखा
| वर्ष | पाश्चात्त्य मंडळ्यापेन्टेकॉस्ट | ऑर्थोडॉक्स मंडळीपेन्टेकॉस्ट |
|---|---|---|
| 2027 | 16 मे 2027रविवार | 20 जून 2027रविवार |
| 2028 | 4 जून 2028रविवार | 4 जून 2028रविवार |
| 2029 | 20 मे 2029रविवार | 27 मे 2029रविवार |
| 2030 | 9 जून 2030रविवार | 16 जून 2030रविवार |
| 2031 | 1 जून 2031रविवार | 1 जून 2031रविवार |
एखादी तारीख ऑर्थोडॉक्स किंवा कॅथलिक दिनदर्शिकेतील त्या दिवसाचे पाठ उघडते.
ऑर्थोडॉक्स तारखा ज्युलियन दिनदर्शिकेनुसार, जी रशियन, सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत पाळतात: त्यांचे ठरावीक तारखेचे सण नागरी दिनदर्शिकेत 13 दिवसांनी नंतर येतात. नव्या दिनदर्शिकेच्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया आणि इतर) नाताळ 25 डिसेंबरला पाळतात; पास्का आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस जवळजवळ सर्व ऑर्थोडॉक्स मंडळ्यांत सारखेच मोजले जातात.
बायबलमधील उतारे
प्रेषितांची कृत्ये
1नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. 2अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. 3आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. 4तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. 5त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरूशलेम शहरात राहत होते. 6तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले. 7ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन; म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालील प्रांतातील ना? 8तर आपण प्रत्येकजण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे? 9पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आशिया, 10फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यात राहणारे, यहूदी व यहूदीयमतानूसारी असे रोमन प्रवासी, 11क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.” 12तेव्हा ते सर्व विस्मित होऊन; व गोंधळून जाऊन एकमेकांस म्हणाले, “हे काय असेल?” 13परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे नवीन द्राक्षरसाने मस्त झाले आहेत.” 14तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून, त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहूदी लोकांनो व यरूशलेम शहरातील रहिवाश्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. 15तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही कारण सकाळचे नऊ वाजले आहेत. 16परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे: 17देव म्हणतो, “शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. 18आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. 19आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. 20परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. 21तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.”
योएल
28ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन, आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील. 29आणि त्या दिवसात मी माझा आत्मा दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन. 30मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन. 31परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी सूर्य बदलून अंधकारमय आणि चंद्र रक्तमय असा होईल. 32जसे परमेश्वराने म्हटले, जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल. जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील, आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो, ते बाकी वाचलेल्यात राहतील.
योहान
37मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” 39ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
योहान
19त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” 20आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले 21तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हास पाठवतो.” 22एवढे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि तो त्यांना म्हणाला, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. 23ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”
कलेत
पेन्टेकॉस्टड्यूरर · c. 1509/1510?
पवित्र आत्म्याचे अवतरणगुस्ताव डोरे · 1866
प्रेषित उपदेश करतातगुस्ताव डोरे · 1866
पेन्टेकॉस्टजर्मन चित्रकार · mid-13th century
प्रेषितांना दर्शन देणारा ख्रिस्तरेम्ब्रांट · 1656
माडीवरच्या खोलीत ख्रिस्ताचे दर्शन (Apparition du Christ au cénacle)जेम्स टिसो · 1886–1894
आणखी सण
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क