Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › मंडळीच्या वर्षातील सण › प्रकटीकरण सण आणि ईश्वरदर्शन

मंडळीच्या वर्षातील सण

प्रकटीकरण सण आणि ईश्वरदर्शन

6 जानेवारीला पाश्चात्त्य मंडळ्या ज्ञानी लोकांच्या भेटीचे स्मरण करतात; ऑर्थोडॉक्स मंडळी ईश्वरदर्शन, यार्देनेत येशूचा बाप्तिस्मा, पाळते — ज्युलियन दिनदर्शिकेच्या मंडळ्यांत 19 जानेवारीला. दोन्हींचे शुभवर्तमानातील उतारे, पूर्ण.

तारखा

वर्षपाश्चात्त्य मंडळ्याप्रकटीकरण सणऑर्थोडॉक्स मंडळीईश्वरदर्शन
20276 जानेवारी 2027बुधवार19 जानेवारी 2027मंगळवार
20286 जानेवारी 2028गुरुवार19 जानेवारी 2028बुधवार
20296 जानेवारी 2029शनिवार19 जानेवारी 2029शुक्रवार
20306 जानेवारी 2030रविवार19 जानेवारी 2030शनिवार
20316 जानेवारी 2031सोमवार19 जानेवारी 2031रविवार

एखादी तारीख ऑर्थोडॉक्स किंवा कॅथलिक दिनदर्शिकेतील त्या दिवसाचे पाठ उघडते.

ऑर्थोडॉक्स तारखा ज्युलियन दिनदर्शिकेनुसार, जी रशियन, सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत पाळतात: त्यांचे ठरावीक तारखेचे सण नागरी दिनदर्शिकेत 13 दिवसांनी नंतर येतात. नव्या दिनदर्शिकेच्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया आणि इतर) नाताळ 25 डिसेंबरला पाळतात; पास्का आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस जवळजवळ सर्व ऑर्थोडॉक्स मंडळ्यांत सारखेच मोजले जातात.

बायबलमधील उतारे

मत्तय

मत्त 2:1–12

1हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की, 2“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.” 3जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले; 4हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे? 5ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की; 6‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’” 7मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली. 8त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.” 9राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला. 10तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला. 11नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली. 12देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्‍या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.

मत्तय

मत्त 3:13–17

13यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला; 14परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे? 15येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले. 16मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीले, 17आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”

मार्क

मार्क 1:9–11

9त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. 10येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले. 11तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

योहान

योहा 1:29–34

29दुसर्‍या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! 30ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की, ‘माझ्यामागून एकजण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता,’ तो हाच आहे. 31मी त्यास ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.” 32योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. 33मी तर त्यास ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ 34मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”

कलेत

सर्व कलाकृती

आणखी सण

मंडळीच्या वर्षातील सण

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क