मुख्यपृष्ठ › मंडळीच्या वर्षातील सण › उपवासकाळ
मंडळीच्या वर्षातील सण
उपवासकाळ
ईस्टरपूर्वीचे उपवासाचे चाळीस दिवस: पाश्चात्त्य मंडळ्यांत राखेच्या बुधवारपासून, ऑर्थोडॉक्स मंडळीमध्ये शुद्ध सोमवारपासून. अरण्यातील येशूचा उपवास आणि दानधर्म, प्रार्थना आणि उपवास याविषयीची त्याची वचने, पूर्ण.
तारखा
| वर्ष | पाश्चात्त्य मंडळ्याराखेचा बुधवार | ऑर्थोडॉक्स मंडळीशुद्ध सोमवार |
|---|---|---|
| 2027 | 10 फेब्रुवारी 2027बुधवार | 15 मार्च 2027सोमवार |
| 2028 | 1 मार्च 2028बुधवार | 28 फेब्रुवारी 2028सोमवार |
| 2029 | 14 फेब्रुवारी 2029बुधवार | 19 फेब्रुवारी 2029सोमवार |
| 2030 | 6 मार्च 2030बुधवार | 11 मार्च 2030सोमवार |
| 2031 | 26 फेब्रुवारी 2031बुधवार | 24 फेब्रुवारी 2031सोमवार |
एखादी तारीख ऑर्थोडॉक्स किंवा कॅथलिक दिनदर्शिकेतील त्या दिवसाचे पाठ उघडते.
ऑर्थोडॉक्स तारखा ज्युलियन दिनदर्शिकेनुसार, जी रशियन, सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत पाळतात: त्यांचे ठरावीक तारखेचे सण नागरी दिनदर्शिकेत 13 दिवसांनी नंतर येतात. नव्या दिनदर्शिकेच्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया आणि इतर) नाताळ 25 डिसेंबरला पाळतात; पास्का आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस जवळजवळ सर्व ऑर्थोडॉक्स मंडळ्यांत सारखेच मोजले जातात.
बायबलमधील उतारे
योएल
12“तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.” 13आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, कारण तो कृपाळू व दयाळू आहे, तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल. 14परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल, आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे? त्यास अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील? 15सियोनात कर्णा फुंका. एक पवित्र उपास नेमा, आणि पवित्र मंडळीला बोलवा. 16लोकांस एकत्र जमवा, मंडळीला पवित्र करा. वडिलांना एकत्र करा, मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा. वर आपल्या खोलीतून आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो. 17याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना, द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर. आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे?
मत्तय
1मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. 2चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली. 3तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.” 4परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’” 5मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले. 6आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’” 7येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’” 8मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली. 9आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.” 10येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’” 11मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले.
मत्तय
1लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही. 2म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. 3म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. 4जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल. 5जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे. 6पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल. 16जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे. 17तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. 18यासाठी की, तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल. 19तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. 20म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. 21जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
कलेत
ख्रिस्ताची परीक्षाहुआन दे फ्लांदेस · c. 1500/1504
ख्रिस्ताची परीक्षालुकास व्हान लायडन · 1518
आत्म्याने येशूला उंच पर्वतावर नेले (Jésus transporté par l'esprit sur une haute montagne)जेम्स टिसो · 1886–1894
येशूला मंदिराच्या टोकावर नेले (Jésus porté sur le pinacle du Temple)जेम्स टिसो · 1886–1894
देवदूत येशूची सेवा करतात (Jésus assisté par les anges)जेम्स टिसो · 1886–1894
आणखी सण
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क