Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › मार्ग › शमशोनाचे प्रवास

मार्ग

शमशोनाचे प्रवास

तिम्ना, अष्कलोन, गज्जा व सोरेक खोरे · 9 टप्पे · सरळ रेषांत ≈ 300 किमी

यहूदीयापलिष्टीयासरातिम्नाअष्कलोनलेहीगज्जाहेब्रोनसोरेक खोरे20 किमी12345678

© OpenStreetMap contributors

टप्पे

  1. सराशास्ते 13:2तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी मनुष्य होता; त्याचे नाव मानोहा होते, आणि त्याची स्त्री वांझ होती, यास्तव तिला लेकरू झाले नव्हते.
  2. तिम्नाशास्ते 14:1नंतर शमशोन खाली तिम्ना नगरात गेला, आणि त्याने तिम्नामध्ये पलिष्ट्यांच्या मुलींमध्ये एक स्त्री पाहिली.
  3. अष्कलोनशास्ते 14:19नंतर परमेश्वराचा आत्मा एकाएकी सामर्थ्याने त्याच्यावर आला. शमशोन खाली अष्कलोन नगरास गेला आणि त्याने त्यांच्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्याच्या कोड्याचे उत्तर सांगणाऱ्यांना त्याने ते कपड्यांचे जोड दिले; त्यास खूप राग आला होता, आणि तो त्याच्या वडिलाच्या घरी निघून गेला.
  4. एटामशास्ते 15:8नंतर त्याने त्यांना मांडीवर व कंबरेवर मारून त्यांचे तुकडे तुकडे करून मोठी कत्तल केली. नंतर तो खाली गेला आणि उंच कड्याच्या एटाम दरीत गुहेमध्ये जाऊन राहिला.
  5. लेहीशास्ते 15:9मग पलिष्टी बाहेर आले आणि त्यांनी यहूदामध्ये येऊन लढाईची तयारी केली, आणि त्यांनी लेहीत त्यांच्या सैन्याची व्यूहरचना केली.
  6. गज्जाशास्ते 16:1शमशोन पलिष्टी प्रदेशाच्या गज्जा शहरास गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला.
  7. हेब्रोनशास्ते 16:3शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले.
  8. सोरेक खोरेशास्ते 16:4त्यानंतर असे झाले की, तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते.
  9. गज्जाशास्ते 16:21पलिष्ट्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे.

रेषा पाठाच्या क्रमाने मुक्कामांना जोडतात. जिथे रेषा जमिनीच्या उंचसखलपणाला धरून जाते, तो एका अभ्यासकाने पुन्हा उभा केलेला संभाव्य मार्ग आहे; इतरत्र ती सरळ आहे — मार्ग माहीत नाही. अंतरे मुक्कामांमधील सरळ रेषेत आहेत. तुटक रेषा: जहाजाने. फिकट: ठिकाण निश्चित नाही.

प्रत्येक बिंदू सर्वाधिक संभाव्य स्थळ आहे; फिकट बिंदू म्हणजे ओळख अनिश्चित आहे. ज्या ठिकाणांचे स्थळ अज्ञात आहे ती नकाशावर नाहीत.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · UBS Bible Routes, Dr Leen Ritmeyer © United Bible Societies 2023, CC BY-SA 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क