शोधा › यात्रेकरूंसाठी › यार्देनेच्या पलीकडे: बाप्तिस्म्याचे स्थान आणि नबो पर्वत › यब्बोकाजवळील पनुएल
यार्देनेच्या पलीकडे: बाप्तिस्म्याचे स्थान आणि नबो पर्वत · टप्पा 8 · दिवस 3
यब्बोकाजवळील पनुएल
बायबलमध्ये
याकोबाने आपल्या कुटुंबाला यब्बोक नदीच्या उतारापलीकडे पाठवले आणि तो एकटाच राहिला; एका पुरुषाने पहाट होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली, आणि याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले.
मग याकोब रात्री उठला. त्याने आपल्या दोन्ही स्त्रिया, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांना बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी गेला. अशा रीतीने त्याने आपले जे सर्वकाही होते त्यांसह सर्वांना नदी पार करून पाठवले. याकोब एकटाच मागे राहिला होता, आणि एक पुरुष आला व त्याने याकोबाशी सूर्य उगवेपर्यंत कुस्ती केली. जेव्हा त्या मनुष्याने पाहिले की, आपण याकोबाचा पराभव करू शकत नाही, तेव्हा त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला. तेव्हा त्याच्याशी कुस्ती करीत असता याकोबाच्या जांघेचा सांधा निखळला. मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.” तो पुरुष त्यास म्हणाला, “तुझे नाव काय आहे?” आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.” तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.” मग याकोबाने त्यास विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.” परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्या वेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला. म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “या ठिकाणी मी देवाला समक्ष पाहिले आहे, तरी माझा जीव वाचला आहे.” मग पनीएलाहून तो पुढे निघाला तेव्हा सूर्य उगवला. याकोब आपल्या पायामुळे लंगडत चालत होता.परंपरा
पनुएल कोठे होते हे निश्चित नाही; एका मतानुसार ते प्राचीन यब्बोक म्हणजे जरका नदीवरील तुलूल अध-धहाबच्या जुळ्या टेकड्यांवर होते.
आज इथे
जरका नदीच्या हिरव्या खोऱ्यावर विखुरलेल्या अवशेषांच्या दोन टेकड्या; तेथे कोणतेही चर्च किंवा पवित्र स्थान नाही, फक्त नदी आणि दृश्य.
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क