Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › मार्ग › पौलाचा पहिला प्रवास

मार्ग

पौलाचा पहिला प्रवास

बर्णबासोबत कुप्र आणि गलतीयाला · 15 टप्पे · सरळ रेषांत ≈ 1,980 किमी

कुप्रकिलिकियाअंत्युखियासलुकीयसलमीपफेपिर्गाअंत्युखियाइकुन्यालुस्रदर्बेअत्तलिया100 किमी12345678914

© OpenStreetMap contributors

टप्पे

  1. अंत्युखियाप्रेषि 13:1अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते, ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता) आणि शौल.
  2. सलुकीयप्रेषि 13:4पवित्र आत्म्याच्याद्वारे बर्णबा व शौल यांना पाठविण्यात आले, ते सलुकीयात गेले, नंतर तेथून समुद्रमार्गे कुप्र बेटावर गेले.
  3. सलमीजहाजानेप्रेषि 13:5ते जेव्हा सलमी शहरात आले, तेव्हा त्यांनी देवाचे वचनाची यहूदी लोकांच्या सभास्थानात घोषणा केली मार्क म्हटलेला योहान हाही त्यांच्या मदतीला होता.
  4. पफेप्रेषि 13:6ते संपूर्ण बेट पार करून पफे शहरास गेले, पफे येथे त्यांना एक यहूदी मनुष्य भेटला, तो जादूच्या करामती करीत असे, त्याचे नाव बर्येशू होते, तो खोटा संदेष्टा होता.
  5. पिर्गाजहाजानेप्रेषि 13:13पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले, ते पंफुलियातील पिर्गा गावी आले, परंतु योहान त्यांना सोडून परत यरूशलेमे शहरास गेला.
  6. अंत्युखियाप्रेषि 13:14पौल व त्याच्या मित्रांनी त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवला, पिर्गापासून पुढे ते पिसिदीयांतील अंत्युखियास गेले आणि शब्बाथ दिवशी ते सभास्थानात गेले आणि तेथे बसले.
  7. इकुन्याप्रेषि 13:51मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले.
  8. लुस्रप्रेषि 14:6पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
  9. दर्बेप्रेषि 14:20पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे शहरास गेले.
  10. लुस्रप्रेषि 14:21आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
  11. इकुन्याप्रेषि 14:21आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
  12. अंत्युखियाप्रेषि 14:21आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.
  13. पिर्गाप्रेषि 14:25त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.
  14. अत्तलियाप्रेषि 14:25त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.
  15. अंत्युखियाजहाजानेप्रेषि 14:26नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.

रेषा पाठाच्या क्रमाने मुक्कामांना जोडतात. जिथे रेषा जमिनीच्या उंचसखलपणाला धरून जाते, तो एका अभ्यासकाने पुन्हा उभा केलेला संभाव्य मार्ग आहे; इतरत्र ती सरळ आहे — मार्ग माहीत नाही. अंतरे मुक्कामांमधील सरळ रेषेत आहेत. तुटक रेषा: जहाजाने. फिकट: ठिकाण निश्चित नाही.

प्रत्येक बिंदू सर्वाधिक संभाव्य स्थळ आहे; फिकट बिंदू म्हणजे ओळख अनिश्चित आहे. ज्या ठिकाणांचे स्थळ अज्ञात आहे ती नकाशावर नाहीत.

रोमी रस्ते: सुमारे इ.स.पू. 300 – इ.स. 300 या काळातील रोमी साम्राज्याचे रस्ते; तुटक रेषा — ज्या रस्त्यांचा मार्ग अनुमानित मानला जातो ते. त्यांच्यावरून प्रवासाचा नेमका मार्ग मजकुरात वर्णिलेला नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · Itiner-e © 2024 Brughmans, Pažout, de Soto, Bjerregaard Vahlstrup, CC BY 4.0 · UBS Bible Routes, Dr Leen Ritmeyer © United Bible Societies 2023, CC BY-SA 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क