शोधा › जुने नकाशे › पवित्र भूमी, टिलेमान स्टेला
नकाशा पूर्ण आकारात उघडा (3000 × 2287)
जुने नकाशे · सुमारे 1600
पवित्र भूमी, टिलेमान स्टेला नकाशाकार: Stella, Tilemann · वर्ष: सुमारे 1600
जर्मन विद्वान टिलेमान स्टेला यांनी काढलेला आणि अँटवर्प येथे गेरार्ड दे योडे यांनी प्रकाशित केलेला वचनदत्त देशाचा नकाशा. समुद्रकिनारा वरच्या बाजूने जातो, म्हणजे पश्चिम दिशा वर आहे, आणि देश इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटलेला आहे. खालच्या कडेला यरूशलेमचे दृश्य आहे; डावीकडे बेथलेहेममधील चॅपेल आणि उजवीकडे पवित्र कबरीवर बांधलेले चॅपेल.
Library of Congress मधील नकाशा
उतारे गण 34:1–12 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, इस्राएल लोकांस ही आज्ञा दे आणि त्यांना सांग, तुम्ही कनान देशात येत आहात. तुम्ही त्या देशाचा पराभव करा. तुम्ही सर्व कनान देश घ्या. दक्षिणेकडे अदोमाजवळच्या त्सीन रानाचा काही भाग तुम्हास मिळेल. तुमची दक्षिणेकडची सीमा मृत समुद्राच्या दक्षिण टोकापासून सुरु होईल. तेथून अक्रब्बीम चढावाचे दक्षिण टोक पार करून ती त्सीन रानातून कादेश-बर्ण्याला जाईल. आणि नंतर हसर-अद्दारपर्यंत जाऊन असमोनाला पोहोचेल. असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल. तुमची पश्चिमेकडची सीमा म्हणजे महासमुद्र व त्याचा किनारा राहिल तीच तुमची पश्चिम सीमा आहे. तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी. होर पर्वतावरुन ती लेबो हमाथाला जाईल व तेथून सदादला. नंतर ती सीमा जिप्रोनला जाईल व हसर-एनानला ती संपेल. तेव्हा ती तुमची उत्तर सीमा. तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल. शफामपासून ती अईनाच्या पूर्वेकडे रिब्लाला जाईल. ती सीमा उतरत किन्नेरेथ समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या पर्वतांच्या रांगापर्यंत जाईल. आणि नंतर ती यार्देन नदीच्या काठाने जाऊन मृतसमुद्रात तिची समाप्ती होईल. तुझ्या देशाच्या या सीमा आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0 ; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क