मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › ऑगस्ट 2027 › 25 ऑगस्ट
ऑर्थोडॉक्स दिनदर्शिका · 12 ऑगस्ट (जुनी पद्धत)
ऑर्थोडॉक्स दैनंदिन पाठ — 25 ऑगस्ट 2027
बुधवार · पेन्टेकॉस्टनंतरचा 10वा आठवडा · स्वर 8
सण आणि संत
Afterfeast of the Transfiguration of the Lord
मरीयेच्या निद्रेचा उपवास
कडक उपवास (कोरडे अन्न: भाकर, भाज्या, फळे)
हे मठाच्या नियमानुसार आहे. पॅरिशमध्ये उपवासाचे प्रमाण आपल्या पापकबुलीच्या धर्मगुरूसोबत, आरोग्य, वय आणि परिस्थितीनुसार ठरवले जाते.
दिवसाची वाचने
प्रेषितांचे पत्र
4आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील. 5मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे. 6आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे. 7कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हास भेटण्याची माझी इच्छा नाही कारण जर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्यासमवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो. 8पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन 9कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात. 10जर तीमथ्य आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या कारण तोसुध्दा माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे. 11यास्तव कोणीही त्यास तुच्छ मानू नये. तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्यास शांतीने पाठवा कारण इतर बंधूंबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. 12पण बंधू अपुल्लोविषयी असे आहे की, त्याने इतर बांधवांबरोबर तुमच्याकडे यावे, अशी मी त्यास फार विनंती केली पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती पण त्यास सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल.
शुभवर्तमान
28याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा; “एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’ 29मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला. 30नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही. 31त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.” येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32कारण योहान नीतिमत्त्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.”
तारखा रशियन मंडळीच्या ज्युलियन दिनदर्शिकेनुसार आहेत (सर्बियन आणि जॉर्जियन मंडळ्या आणि आथोस पर्वत यांच्याप्रमाणे): मंडळीच्या दिनदर्शिकेतील 12 ऑगस्ट म्हणजे नागरी दिनदर्शिकेतील 25 ऑगस्ट. नवी दिनदर्शिका पाळणाऱ्या मंडळ्या (ग्रीस, रोमानिया, बल्गेरिया, युक्रेन…) ठरावीक तारखेचे सण आणि संत त्याच नागरी तारखेला, 13 दिवस आधी, पाळतात, आणि त्यांचे काही पाठ वेगळे आहेत; ईस्टर आणि त्यावर अवलंबून असलेले दिवस सारखेच आहेत.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क