Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › यात्रेकरूंसाठी › प्रकटीकरणातील सात मंडळ्या आणि पात्म › अर्तमीचे मंदिर

प्रकटीकरणातील सात मंडळ्या आणि पात्म · टप्पा 2 · दिवस 1

अर्तमीचे मंदिर

बायबलमध्ये

अर्तमी देवीचे देव्हारे बनवणाऱ्या देमेत्रिय नावाच्या सोनाराने कारागिरांना भडकावले; शहराच्या लेखनिकाने इफिसला थोर अर्तमीच्या मंदिराचे रक्षणकर्ते म्हटले.

प्रेषि 19:24–28देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत. त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत. ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहूना जगसुद्धा करते तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे. जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.”
प्रेषि 19:35शहराचा लेखनिक लोकांस शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे, हे ज्याला माहीत नाही असा एकतरी मनुष्य जगात आहे काय?

आज इथे

एकेकाळी जगातील सात आश्चर्यांपैकी एक; आता सेल्चुकच्या खाली एका दलदलीच्या शेतात तुकड्यांपासून पुन्हा उभा केलेला एकच स्तंभ उभा आहे.

प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क