Bible Explorer अ‍ॅप मिळवा

मुख्यपृष्ठ › लोकप्रिय बायबल वचने › योहान 1:1

बायबल वचन · IRV

योहान 1:1

प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.

संपूर्ण अध्याय वाचा: योहान 1

संदर्भात

1प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.

2तोच प्रारंभी देवासह होता.

3सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही.

4त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.

योहान 1

इंग्रजीत

Berean Standard BibleJohn 1:1In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God.

संदर्भ-वचने

वाचक याच्याशी सर्वाधिक जोडतात ते उतारे.

उत्प 1:1प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.
योहा 17:5तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर.
प्रक 19:13त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे;
कल 1:17तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे.
योहा 1:14शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
1 योहा 1:1–2जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले.
प्रक 22:13मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क