मुख्यपृष्ठ › दैनंदिन बायबल पाठ › जून 2027 › 5 जून
कॅथलिक दिनदर्शिका
दैनंदिन बायबल पाठ (कॅथलिक) — 5 जून 2027
शनिवार · सामान्यकाळाचा 9वा आठवडा
सण आणि संत
सामान्यकाळाच्या 9व्या आठवड्याचा शनिवार
ऐच्छिक स्मृतिदिन · उपासनेचा रंग: हिरवा
संत बोनिफेस, बिशप आणि हुतात्मा · ऐच्छिक स्मृतिदिन
धन्य कुमारी मरीयेचे निष्कलंक हृदय · ऐच्छिक स्मृतिदिन
दिवसाची वाचने
पहिले वाचन
या भाषांतरात नाही
प्रतिसाद स्तोत्र
या भाषांतरात नाही
शुभवर्तमान
38शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. 39आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. 40ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांस फार कडक शिक्षा होईल.” 41येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. 42नंतर एक गरीब विधवा आली व तिने दोन तांब्याची नाणी म्हणजे एक दमडी टाकली. 43येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. 44मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
आजचे संत
- संत बोनिफेस, बिशप आणि हुतात्मा
सामान्य रोमन दिनदर्शिका; बिशपांची परिषद काही सण (प्रभूचे प्रकटीकरण, स्वर्गारोहण, ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) रविवारी हलवू शकते किंवा स्वतःचे सण जोडू शकते. पाठसंग्रह: रविवारचे चक्र B, आठवड्याच्या दिवसांचे वर्ष I.
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क