शोधा › यात्रेकरूंसाठी › प्रकटीकरणातील सात मंडळ्या आणि पात्म › सार्दीस
प्रकटीकरणातील सात मंडळ्या आणि पात्म · टप्पा 9 · दिवस 3
सार्दीस
बायबलमध्ये
सार्दीसला: तू जिवंत आहेस असे तुझे नाव आहे, पण तू मेलेला आहेस; जागा हो. तरी तेथे काही जणांनी आपली वस्त्रे मलीन केली नाहीत, आणि ते शुभ्र वस्त्रात चालतील.
सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही. म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले याची आठवण करा, त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हास कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे मलीन केली नाहीत अशी थोडी नावे सार्दीसमध्ये तुझ्याजवळ आहेत, ते माझ्याबरोबर शुभ्र वस्त्रात चालतील कारण ते लायक आहेत.आज इथे
कोपऱ्यात लहान बायझंटाईन चर्च असलेले अर्तमीचे मंदिर, पुन्हा उभी केलेली व्यायामशाळा आणि सर्वांत मोठ्या प्राचीन सभास्थानांपैकी एक.
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क