शोधा › यात्रेकरूंसाठी › यरूशलेम: पायी पवित्र आठवडा › बाग-कबर
यरूशलेम: पायी पवित्र आठवडा · टप्पा 14 · दिवस 6
बाग-कबर

बायबलमध्ये
वधस्तंभाच्या जागेजवळ एक बाग होती आणि तिच्यात एक नवी कबर होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे मग्दालीया नगराच्या मरीयेला धोंड काढलेली आढळली; पेत्र आणि तो दुसरा शिष्य धावत गेले आणि त्यांनी तागाची वस्त्रे पाहिली.
त्यास ज्याठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवी कबर होती; त्यामध्ये कोणाला कधीही ठेवलेले नव्हते. तो यहूद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे, त्यांनी येशूला तेथे ठेवले.आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीती होती त्या दुसर्या शिष्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून काढून नेले आणि त्यास कोठे ठेवले हे आम्हास माहीत नाही.” म्हणून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे जण बरोबर धावत गेले; पण तो दुसरा शिष्य पेत्राच्या पुढे धावत गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला. त्याने ओणवून आत डोकावले आणि त्यास तागाची वस्त्रे पडलेली दिसली. पण तो आत गेला नाही. शिमोन पेत्रहि त्याच्यामागून येऊन पोहचला व तो कबरेत शिरला; आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्या तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून ठेवलेला होता. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला.परंपरा
19व्या शतकापासून काही प्रोटेस्टंटांनी येथे, कवटीसारख्या दिसणाऱ्या खडकाळ टेकडीजवळ, वधस्तंभावर खिळण्याचे आणि दफनाचे स्थान पाहिले आहे. पुरातत्त्वज्ञ ही कबर येशूच्या कित्येक शतके आधीची मानतात; तिचे रक्षक निश्चिततेचा दावा करत नाहीत.
आज इथे
दिमिष्क वेशीच्या उत्तरेला खडकात कोरलेली कबर असलेली एक शांत बाग, 1894 पासून गार्डन टूम असोसिएशनच्या देखरेखीखाली; गट तेथे उपासना करतात.
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क