शोधा › यात्रेकरूंसाठी › एका आठवड्यात पवित्र भूमी › दोमिनुस फ्लेव्हिट
एका आठवड्यात पवित्र भूमी · टप्पा 6 · दिवस 2
दोमिनुस फ्लेव्हिट

बायबलमध्ये
येशू जैतूनाच्या डोंगरावरून खाली येत असताना शिष्यांचा समुदाय मोठ्याने देवाची स्तुती करू लागला. शहर पाहून तो त्यासाठी रडला आणि शत्रू त्याला वेढा घालतील त्या दिवसांविषयी बोलला.
तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला. ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.” त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.” तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला, “कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत. तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”परंपरा
मध्ययुगापासूनच्या परंपरेनुसार, यात्रेकरू शिखरावरून खाली येतात त्या वाटेवर, याच उतारावर येशू यरूशलेमेसाठी रडला.
आज इथे
अश्रूच्या आकाराचे एक लहान चर्च, 1956 मध्ये एका बायझंटाईन चॅपेलवर बांधलेले; त्याची पश्चिमेकडील खिडकी थेट जुन्या शहराकडे पाहते.
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क