शोधा › यात्रेकरूंसाठी › ग्रीसमध्ये पौल › संत लुदियाचे बाप्तिस्मास्थान
ग्रीसमध्ये पौल · टप्पा 2 · दिवस 1
संत लुदियाचे बाप्तिस्मास्थान
बायबलमध्ये
शब्बाथ दिवशी पौल वेशीबाहेर नदीकाठच्या प्रार्थनास्थळी स्त्रियांशी बोलला; थुवतीरा नगराची जांभळी वस्त्रे विकणारी लुदिया हिचा तिच्या घराण्यासह बाप्तिस्मा झाला.
मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हास वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची उपासना करणारी होती, तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हास मान्य करावी लागली.परंपरा
परंपरेनुसार, जुन्या शहराच्या पश्चिमेकडील या ओढ्यात लुदियाचा बाप्तिस्मा झाला; विद्वान जवळच्या नद्यांकाठच्या इतर जागाही सुचवतात.
आज इथे
संत लुदियाचे आधुनिक चर्च आणि ओढ्याकाठी दगडी आसनांचे उघडे बाप्तिस्मास्थान; गट येथे अनेकदा प्रेषितांची कृत्ये 16 वाचतात.
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क