शोधा › यात्रेकरूंसाठी › सीनाय › जबल मूसाचे शिखर
सीनाय · टप्पा 11 · दिवस 3
जबल मूसाचे शिखर
समुद्रसपाटीपासून 2,285 मी. उंच

बायबलमध्ये
परमेश्वर अग्नीत सीनाय पर्वतावर उतरला आणि त्याने मोशेला शिखरावर बोलावले; तो चाळीस दिवस आणि चाळीस रात्री तेथे राहिला आणि दोन पाट्या घेऊन खाली आला.
परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्यास आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला.मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या. मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्यास भान नव्हते.परंपरा
ख्रिस्ती यात्रेकरूंसाठी किमान 4थ्या शतकापासून जबल मूसा हा नियमशास्त्राचा पर्वत आहे. इतर पर्वतही सुचवले जातात: सेरबाल, रास सफसाफा, आणि नेगेव व वायव्य अरबस्तानातील शिखरे.
आज इथे
1935 मध्ये पूर्ण झालेले पवित्र त्रैक्याचे लहान चॅपेल आणि शिखरावरील एक छोटी मशीद; सूर्योदय पाहण्यासाठी यात्रेकरू रात्री चढतात.
जुन्या यात्रेकरूंच्या नजरेतून
चौथ्या तासाला आम्ही सीनायच्या त्या शिखरावर, देवाच्या पवित्र पर्वतावर पोहोचलो, जेथे नियमशास्त्र दिले गेले … त्या जागी आता एक चर्च आहे — मोठे नाही, कारण ती जागा, पर्वताचे शिखर, स्वतःच मोठे नाही; पण त्या चर्चमध्ये कृपेचा मोठा वाटा आहे.एगेरिया, सुमारे 381–384 · आमचे भाषांतर
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क