शोधा › यात्रेकरूंसाठी › ग्रीसमध्ये पौल › प्राचीन करिंथ
ग्रीसमध्ये पौल · टप्पा 11 · दिवस 5
प्राचीन करिंथ

बायबलमध्ये
पौल अथेनैहून आला आणि अक्विला व प्रिस्किल्ला यांच्याबरोबर तंबू बनवण्याचे काम करू लागला; पुढे त्याने करिंथ शहरातील देवाच्या मंडळीला पत्रे लिहिली. रोमकरांस पत्रात नगर कारभारी एरास्त सलाम पाठवतो.
नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला. करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला. पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला. प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस,माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात.परंपरा
रंगमंदिराजवळच्या फरसबंदीवरील शिलालेखात नाव असलेला एरास्त हाच रोमकरांस पत्रातील एरास्त आहे का, यावर वाद आहे.
आज इथे
ॲक्रोकोरिंथच्या खडकाखाली अपोलोचे मंदिर, रोमन फोरम आणि संग्रहालय; रंगमंदिराजवळ एरास्ताची फरसबंदी.
प्रवासापूर्वी तुमच्या देशाचा प्रवास-सल्ला तपासा. स्थळे उघडी असण्याच्या वेळा आणि नियम बदलतात — त्यांची अधिकृत पाने पाहा.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क